काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी पीएचडी एक्सीलन्स अवॉर्ड 2017 मध्ये सहभागी झाले होते..त्यावेळेस बॉक्सर विजेंदर सिंग पण तिथेच उपस्थित होते त्यांनी राहुल यांना विचारले की, भय्या, तुम्ही लग्न केव्हा करणार आहात? त्यावर राहुल गांधीनी उत्तर दिले की, 'मी विधीलिखितावर विश्वास ठेवतो. जेव्हा व्हायचे असेल, तेव्हा होईल..ह्या कार्यक्रम मधे विजेंदर ने राहुल ला अनेक प्रश्न विचारले त्यांचा राहुल गांधींना पहिला प्रश्न होता कि ते पंतप्रधान झाले तर खेळांमध्ये कशा पद्धतीने सुधारणा घडवून आणतील?' हुल स्पोर्ट्सविषयी म्हणाल तर, मी व्यायाम, रनिंग, स्विमिंगवर भर देतो. एकिडोमध्ये मी ब्लॅकबेल्ट आहे. मी सार्वजनिक ठिकाणी याविषयी कमीच बोलतो. मात्र माझ्या जीवनात स्पोर्ट्स आहे आणि नेहमी राहील. मी रोज एक तास स्पोर्ट्साठी देतो. पुढे विजेंदर सिंग हे ही म्हणाले कि ते त्यांच्या पत्नी बरोबर बोलताना ती मला विचारते राहुल भैय्या लग्न केव्हा करतील? मी तिला सांगितले आहे की, प्रधानमंत्री बनल्यानंतर त्यांनी लग्न केले तर ती बातच काही और असणार आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणुन घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews